पहलगाम हल्ल्यावर विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य; मुख्यमंत्री फडणवीस संतापले, म्हणाले, मूर्खपणा…

पहलगाम घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती जे कोणी खोटे ठरवत आहेत, त्याला मुर्खपणा म्हटले पाहिजे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केले.पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असून, अशा सर्व पाकिस्तानी नागरिकांचा शोध पूर्ण झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. पहलगाम घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती जे कोणी खोटे ठरवत आहेत, त्याला मूर्खपणा म्हटले पाहिजे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केले.‘केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे.

त्याचे ट्रॅकींग केले जात आहे. त्यांची आकडेवारी लवकरच दिली जाईल. परंतु सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.यावेळी फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. त्यांना पर्यटकांबद्दल संवेदना नाहीत.

’‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अडीच वर्षे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. त्यामुळे आपण अडीच वर्ष मागे गेलो. यादरम्यान गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात खूप पुढे निघून गेला. आमचे सरकार आल्यानंतर हे काम आम्ही पुढे नेले. आता खूप चांगले काम झाले आहे. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होईल’, असे फडणवीस म्हणाले.‘सर्व पेपर सुरक्षित’मुंबईतील ईडीच्या इमारतीस लागलेल्या आगीत प्रत्येक पेपर सुरक्षित आहे. या आगीमुळे कोणत्याही कागदाला धक्का लागला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या आगीबाबत विरोधकांनी प्रश्न विचारून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.