भारतीयांचे रक्त उसळतेय; दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना निश्चितच न्याय मिळेल आणि दहशतवादी व त्यांच्या सूत्रधारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल’, अशी ग्वाही रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात दिली. ‘प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे’, असे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना निश्चितच न्याय मिळेल आणि दहशतवादी व त्यांच्या सूत्रधारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल’, अशी ग्वाही रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात दिली.‘दहशतवादाविरोधात देशातील १४० कोटी नागरिकांच्या एकतेची शक्ती मोठी आहे. दहशतवादाच्या विभाजनवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी एकता हाच आधार आहे’,असे मोदी म्हणाले. ‘काश्मीरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत होती. तेथे बांधकाम क्षेत्र झपाट्याने विस्तारत होते. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तेथील नागरिकांचे उत्पन्न वाढत होते. तरुणाईसाठी नव्या संधींचे आकाश खुले झाले होते. शाळा, महाविद्यालयांना नवचैतन्य दिसू लागले होते.

अशा स्थितीत पहलगाम हल्ला करून दहशतवादाच्या आश्रयदात्यांनी भ्याडपणा आणि वैफल्यतेचे दर्शन घडवले आहे’, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश केला.‘काश्मीरमधील हे परिर्वतन देशाच्या, जम्मू-काश्मीरच्या शत्रूला आवडलेले नाही. दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना काश्मीरला पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. त्यामुळेच त्यांनी मोठे कटकारस्थान रचून हा हल्ला केला आहे’, असे मोदी म्हणाले. ‘या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुखावला आहे. देशातील सर्व राज्यांतील सर्व भाषिक नागरिकांना पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असे आश्वासन मी पुन्हा देत आहे’, असे मोदी यांनी नमूद केले.‘जगभरातील नेत्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अनेक नेत्यांनी माझ्याशी फोनद्वारे संपर्क साधला, पत्रे पाठवली, संदेश पाठवले.

अनेक नेत्यांनी या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत दहशतवादाविरोधातील लढाईत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कळवले आहे’, असे मोदी म्हणाले.‘जगात स्वस्त आणि यशस्वी अंतराळ कार्यक्रमांमध्ये भारताने आघाडी घेतली आहे. भारत जगातील अंतराळ शक्ती बनली आहे’, असेही मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले. अंतराळ स्टार्ट्सअपमध्ये तरुणाईने नवी यशोशिखरे पादाक्रांत केली आहेत. दहा वर्षांपूर्वी अशी एक कंपनी होती. आता देशात ३२५ स्पेस स्टार्ट्सअप आहेत, असे मोदी म्हणाले.दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश एकसुरात बोलत असल्याचे आशादायी चित्र आहे. आपण एक देश म्हणून प्रबळ इच्छाशक्तीचे प्रदर्शन करायला हवे. देशापुढील आव्हानाला सामोरे जाण्याचा निर्धार आपण करायला हवा.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.