भारतीय जनता पार्टीचे कजगाव व भडगाव मंडल अध्यक्ष घोषित.

भडगाव : भारतीय जनता पार्टीचे संघटनपर्व अंतर्गत कजगाव मंडलाच्या अध्यक्षपदी अनिल मुरलीधर पाटील (वडजी) तर भडगाव मंडलाच्या अध्यक्षपदी प्रमोद देविदास पाटील (भडगाव पेठ) यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी नाना सुकदेव पाटील (पारोळा), सहाय्यक निवडणूक अधिकारी शितल देशमुख(अमळनेर) यांनी घोषित केली. सदर निवड हि भडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकिचे सूत्रसंचलन सरचिटणीस विनोद नेरकर यांनी केले. याप्रसंगी पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व हिंदू बांधवांना तसेच माजी जि.प.सदस्य श्रावणतात्या लिंडायत यांच्या पत्नी स्व. सुनंदाताईंना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संघटनपर्व अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य नोंदणी, बुथ समिती गठन करण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती. त्यातीलच मंडल अध्यक्ष निवड हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पद्धतीने मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अनिल पाटील हे महाविद्यालयीन जीवनापासून अ.भा.वि.प.च्या कामात सक्रिय होते. १५ वर्षापासून भाजपात विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या असून सलग तीन टर्म सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. तर प्रमोद देविदास पाटील हे पण विद्यार्थी दशेपासून अ.भा.वि.प. कामात सक्रिय होते. बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस,भाजपा शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील, कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेले पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सदर निवडीबद्दल महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री मा.ना.गिरीषभाऊ महाजन, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, संघटनमंत्री रविजी अनासपुरे, आमदार मंगेशदादा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, जिल्हा निवडणूक अधिकारी नंदुभाऊ महाजन, डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, माजी सभापती सुभाष पाटील, प्रदेश कार्यकारीणी निमंत्रित सदस्य अमोल नाना पाटील, यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे अभिनंदन केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.