ईडीचे मुंबईसह गुजरातमध्ये छापे; न्यू इंडिया बॅंक फसवणूकप्रकरणी एक कोटीची जप्ती.

 न्यू इंडिया बॅंकेतील सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकले.न्यू इंडिया बॅंकेतील सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकले. मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ नुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंसह गुन्हे आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.आरबीआयने जोखीम मूल्यांकन केल्यानंतर न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची १२२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बॅंकेच्या ठेवीदारांची फसवणूक करून वळता केलेल्या निधीचा तपास ईडीकडून सुरू आहे.या बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू यांनी विदेशांतील आपल्या संस्थांमध्ये आणि नंतर एनपीएमध्ये बदललेल्या कर्ज खात्यांमधून मोठी रक्कम वळवल्याचे पुरावे आहेत. हिरेन भानूशी संबंधित विदेशी संस्थांमध्ये ४५ कोटी रुपये पाठवले असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे, असे ईडीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.शहर परिसरात ड्रग्ज तस्करीचा कट उघड़कीस आणत ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने राजस्थानच्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ४८ लाख ४१ हजारांचे २४२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या ड्रग्ज तस्करीमध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के यांच्या पथकाने नुकतेच घोडबंदर रस्त्यावरील गायमुख परिसरात सापळा लावून घेवाराम ओखाराम पटेल (२१) याला ताब्यात घेत अटक केली. यावेळी त्याच्याकडून एमडी जप्त करण्यात आले. मूळचा राजस्थानचा असलेला घेवाराम सध्या हैदराबादमध्ये वास्तव्य करत आहे. तो नातेवाइकाच्या मोबाइल दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.