पुणे हादरवणाऱ्या बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, अखेर पोलिसांना यश.

बोपदेव घाटावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सूरज ऊर्फ बापू गोसावी याला वालचंदनगर पोलिसांनी अकलूज परिसरातून अटक केली. यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख यांना अटक केली होती, परंतु गोसावी फरार होता. खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना वालचंदनगर पोलिसांना गोसावी विषयी माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.बोपदेव घाट येथे साडेसहा महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी (२६ एप्रिल) अकलूज परिसरातून पकडले. सूरज ऊर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. त्या वेळी गोसावी हा फरार झाला होता.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक गोसावीच्या मागावर होते. त्याची ओळख पोलिसांनी पटवली होती.

मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. वालचंदनगर पोलिसांचे पथक एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, त्यांना गोसावीची माहिती मिळाली.त्यांनी सापळा लावून गोसावीला ताब्यात घेतले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गोसावीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती.बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना तीन ऑक्टोबर २०२४ ला रात्रीच्या वेळेस घडली होती. शहर पोलिसांची सुमारे ६० पथके आरोपींचा शोध घेत होती. पोलिसांनी बोपदेव घाट परिसरातील ४५ गावे, वाड्या-वस्त्यांवरील ४५० सराईत गुन्हेगारांची चौकशी केली होती. आरोपींची ओळख पटवून पोलिस त्यांच्या मागावर होते. १० ऑक्टोबरला आरोपी कनोजियाला येवलेवाडी परिसरातून अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होती.दरम्यान, शनिवारी (२६ एप्रिल) कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गोसावी अकलूज येथील जुन्या बस स्थानक परिसरात असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर यांनी केली. गोसावी हा घटनेनंतर फरार झाला होता. पुणे पोलिसांना त्याची माहिती मिळत नव्हती. त्यात तो मोबाइल वापरत नसल्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.