महिलांना बुरखा घालण्याची पद्धत सांगितली,धर्म बदलून नाव..; नाशिककरांचा पहलगाममधील थरारक अनुभव.

22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.या हल्ल्यातून नाशिकमधील तीन कुटुंबे थोडक्यात बचावली.या हल्ल्यातून ते कसे बचावले तेथील परिस्थिती नेमकी काय होती याबद्दल त्यांनी सांगितले.पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.या हल्ल्यातून नाशिकमधील तीन कुटुंबे थोडक्यात बचावली.या हल्ल्यातून ते कसे बचावले तेथील परिस्थिती नेमकी काय होती याचे अनुभव समीर चौगुले आणि त्यांच्या मित्रांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहेत.ते म्हणाले की, ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळी जे नौदल अधिकारी विनय नरवाल हे आमच्या बाजूने गेले. त्यांनी हाफ पँट घातली होती. एवढ्या थंडीत ते हाफ पँटवर होते याबद्दल आमच्यात चर्चाही झाली. ज्यावेळी त्या हल्ल्याची बातमी ऐकली आणि सर्वत्र धावपळ उडाली आम्ही ड्रायव्हरला सांगितले की तू गाडी रिसोर्टला घे. इथे थांबवू नको रिस्क आहे. तर ड्रायव्हर म्हणाला कुछ हुआ नही आप सेफ है. आम्ही त्यावेळी मॅगी खात होतो.

ती मॅगी तशीच टाकली आणि गाडी बसलो त्या धावपळीत आमची गाडी दोनदा ठोकली.स्थानिक लोकांनी घटनेबद्दल सांगितले का हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला कोणीच काही सांगितले नाही. पण ते कोणाशी तरी फोनवरुन बोलताना सांगत होते की, दो जन दफन हुआ है,आम्ही त्यांना विचारत होतो काय झाले आहे पण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला काही सांगितले नाही. आम्ही रिसोर्टला गेल्यानंतर बातम्या पाहिल्या त्यावेळी आम्हाला कळाले की तिथे मोठी घटना घडली आहे. आपण सुखरुप त्यातून बचावलो गेलो आहे.आमचा शेवटचे ठिकाण हे पहलगामला होते. ती जी रात्र होती ती आम्हाला भयानक दृश्य दाखवणारी होती. आमचे तेथे काही लोक ओळखीचे होते. त्यांच्या मदतीने आम्हाला तिथे जेवण आणि इतर व्यवस्था चांगली झाली.

त्या दिवशी तिथे मुक्काम केला परंतु तरीपण कोणाला बाथरुमला जायचे असेल तरीही तिघांना सोबत घ्यायचो. ती रात्र तिथे काढली. त्यानंतर पहलगाममधून आम्ही मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवला.कुटुंबांची काळजी घेताना काही मित्रांनी असे सांगितले होते की, तुमची गाडी अडवली अथवा कोणी विचारपूस केली तर नाव वेगळ्या पद्धतीचे सांगा. आमच्या ज्या महिला होत्या त्यांना आम्ही काजळ लावायला लावले. सिंदुर लावू नका असे सांगितले, डोळ्यात सुरमा लावायला लावला. तसेच बुरखा घालण्याची पद्धत आम्ही त्यांना सांगितली. कानातले घालू नका असे सांगितले. परिस्थिती आली तर धर्म बदलून नाव सांगण्याची तयारी ठेवली होती.आम्ही तेथे गेलो पहिल्यांदाच गेलो होतो आमचे कुटुंबीय घाबरले आहेत. काहीजण आजारीही पडले आहेत. आता कधीच जम्मू काश्मीरचा प्रवास करणार नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.