‘वाचवा….बाबा वाचवा’, दबा धरुन बसलेल्या बिबट्याची तरुणीवर झडप, २० वर्षांच्या लेकीचा बापासमोरच अंत.

नाशिक दिंडोरी मार्गावरील वानरवाडी गावाजवळ राजेंद्र चव्हाण कुटुंबासहीत आपल्या शेतात काम करत होते. गुरांना चारा मिळावा यासाठी पायल ऊसाच्या शेतालगत असलेले गवत कापत होती. त्याचवेळी शेतात आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मागून येऊन पायलवर झडप घातली.नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. पायल राजेंद्र चव्हाण असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकून वडीलांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु बिबट्याने मुलीचे लचके तोडत तीला ठार केले. या घटनेने वानरवाडी गावात हळहळ व्यक्त होत असून वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या परिसरात अनेकवेळा बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून आला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने वनविभागाकडे केली. पण, त्याकडे वनविभागाकडून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे गावकऱ्यांनी म्हटले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक दिंडोरी मार्गावरील वानरवाडी गावाजवळ राजेंद्र चव्हाण कुटुंबासहीत आपल्या शेतात काम करत होते. गुरांना चारा मिळावा यासाठी पायल ऊसाच्या शेतालगत असलेले गवत कापत होती. त्याचवेळी शेतात आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मागून येऊन पायलवर झडप घातली. बिबट्याने शिवारातच तिला ओढत नेत असताना मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्याने तिच्या वडिलांनी आणि आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोठमोठ्याने आरडाओरड झाल्याने बिबट्याने पायलला तसेच सोडून पळ काढला. रक्ताने माखलेल्या पायलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्यास मिळाल्याने नातेवाईकांनी तिला दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.अभ्यासात हुशार असलेली २० वर्षिय पायल चव्हाण नाशिकच्या मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरांवर आणि माणसांवर हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वी एका गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.