बायकोला निर्घृणपणे संपवलं, बॉडीजवळ मुलांना कोंडून पळ काढला; 8 वर्षांच्या चिमुरड्याने बापाला जन्माची अद्दल घडवली.

पिसादेवी येथील बाजार समितीत लिपिक पदावर कार्यरत असलेला सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (रा. रुक्मिणी स्केअर, पिसादेवी) याने 15 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पत्नी कवितासोबत वाद घालत डंबेल्सच्या लोखंडी रॉडने आणि गळा दाबून खून केला.मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून व डोक्यात लोखंडी डम्बेल्स घालून निर्घृण खून करणारा पती सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी याला जन्मठेप व 37 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी (25 एप्रिल) ठोठावली. त्याशिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मृताच्या मुलीला नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पिसादेवी येथील बाजार समितीत लिपिक पदावर कार्यरत असलेला सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (रा. रुक्मिणी स्केअर, पिसादेवी) याने 15 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पत्नी कवितासोबत वाद घालत डंबेल्सच्या लोखंडी रॉडने आणि गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीने आठ वर्षीय मुलगा आणि तीन वर्षीय मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ डांबून पळ काढला.मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी सायंकाळी घराचे कुलूप तोडून मुलांना बाहेर काढले. चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळावरून दगड, लोखंडी डंबेल्स, रॉड आणि मोबाइल जप्त केला.दरम्यान, मुलगी कविता हिचा खून झाल्याचे कळताच नाशिक (लोणार) येथील तिचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी हेदेखील नातेवाइकांसोबत पिसादेवी येथे आले. प्रकरणात जगदीश अवस्थी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी सिद्धेश त्रिवेदी याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याने आरोपीला दमन येथून अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात आहे.खटल्याच्या सुनावणीवेळी, अतिरिक्त लोकाभियोक्ता सतीश मुंडवाडकर यांनी 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताचा मुलगा याची साक्ष महत्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम 302 अन्वये जन्मठेप, 25 हजार रुपयांचा दंड, कलम 326 अन्वये 5 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपयांचा दंड, 323 अन्वये 2 वर्षांची शिक्षा, 5 हजार रुपये दंड, कलम 323 मध्ये एक वर्ष शिक्षा, 1 हजार दंड आणि कलम 342 अन्वये एक वर्षाची शिक्षा ठोठावली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.