मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पाठलाग, वाहनांची तोडफोड, तरुण इमारतीच्या टेरेसवर गेल्यानं बचावला; नाशिकमधील थरारक घटना.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका टोळक्याने युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका टोळक्याने युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. तसेच, परिसरातील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करुन दहशत माजविली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात टोळक्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खोडेनगरातील  बनकर मळा परिसरात बुधवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. शुभम संतोष मनवर (20, रा. बनकर मळा) याच्या फिर्यादीनुसार, संशयित योगेश उर्फ दाद्या लिलके व इतर पाच जणांनी मिळून शुभमवर हल्ला केला. जुलै 2023 मध्ये तुषार चावरे या युवकाचा खून करण्यात आला होता.

मैत्रीणीस मेसेज करतो या कारणातून मारेकऱ्यांनी त्याचा खून केला होता. या घटनेनंतर योगेश लिलके व इतरांमध्ये राग होता. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास संशयित योगेश लिलके व इतर जोडीदारांनी शुभमवर हल्ला केला. कोयता उगारून शुभमचा पाठलाग केला. सुदैवाने शुभम एका इमारतीच्या टेरेसवर गेल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, संशयितांनी एका सोसायटीत पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वाखारी (ता. नांदगाव ) शिवारात एक 17 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रविंद्र उर्फ मुन्ना दिपक आहीरे रा. बोधे दहिवाळ (ता. मालेगाव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, मृतदेह मिळाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांत गुन्ह्याची उकल करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांनी खून केल्याची कबुली दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.