संतापजनक! शिक्षकी पेशाला काळिमा; महिला पालकावर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार; दोन शिक्षकांना बेड्या.

 “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार केलेय.”तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे. मलकापूर शहरातील नामांकित असलेल्या नूतन विद्यालयातील शिक्षक समाधान इंगळे आणि अनिल थाटे यांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे कृत्य केलं आहे. तुझ्या मुलाला आम्ही भरपूर मार्क्स टाकून नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ.., त्यासाठी आम्हाला खुश करावा लागेल…! असं म्हणत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची ही संतापजनक घटना उजेडात येताच जिल्ह्यासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार,

पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे . दोघांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे. दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशीच एक मोठी बातमी बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. यात बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने एका खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप सुनावली आहे. 2020 मधील हे खून प्रकरण असून 15 साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावलीय.  बीडच्या पिंपळनेर येथे मोहम्मद शरीफ अबुलगणी कुरेशी यांचा 29 सप्टेंबर 2020 मध्ये त्यांच्याच पुतण्याने खून केला होता. कलम 302 नुसार पुतण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणी वेळी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले.

ज्यात मोहम्मद यांचा मृत्यूपूर्व जबाब, परिस्थिती जन्यपुरावा, वैद्यकीय पुरावा, याचे अवलोकन करून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी फारूक रमजान कुरेशी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.यवतमाळच्या पुसद-हिंगोली रोडवरील आमदरी हिवळणी मार्गावरील घाटात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झालाय.  तर त्याच्यासोबत असलेल्या दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले. उमेश जमदाडे असे मृतकाचे नाव आहे. तर मिलिंद वाहुळे, नितीन जमदाडे असे जखमींचे नाव आहे. हे तिघेजण शेंबाळपिंपरी वरून पुसदकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.  दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून कार चालकावर गुन्हा दाखल केलाय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.