पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रत्युत्तर; LOC वर भारतीय सेना आणि पाक आमने-सामने.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने LOC वर केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असून लष्करप्रमुख परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला रवाना होत आहेत.जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त होत आहे. याचा बदला घेण्याची मागणी भारतीयांकडून होते आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधादरम्यान LOC वर भारत आणि पाकिस्तानी सेनेदरम्यान तणाव सुरू झाला आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानी सैन्याने काही ठिकाणी लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिलं. या घटनेत भारतीय बाजूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भारतीय लष्कराचे अधिकारी अधिक माहिती घेत आहेत.दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपोरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहीम चकमकीत रूपांतरित झाली.या तणावाच्या माहितीनंतर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर आणि उधमपूरला रवाना होत आहेत.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर आणि इतर सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. ते सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. तसंच, ते नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या प्रयत्नांचा आढावा घेतील.२२ एप्रिल रोजी मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले. बुधवारी भारताने पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची आघाडी संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.