मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सातपैकी तीन धरणांतील पाणीसाठा खालावला, कोणत्या धरणात किती पाणी.

मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गत वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य सरकारने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयांतून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर महापालिकेचे बारकाईने लक्ष आहे.जून-जुलैपर्यंत पुरेल अशारीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन जरी असले तरीही हळूहळू कमी होणाऱ्या पाणीसाठ्धामुळे चिंताही कायम आहे, त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मोडक सागर, तानसा आणि तुळशी या तीन धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा खाली आल्यास भातसा व अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज आतापासूनच आहे. २७ टक्के पाणीसाठा सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा हा मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून होतो. सातही धरणांची पाणी साठवणक्षमता ही १४ लाख ४७हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यातून दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. वाढलेला उकाडा आणि पाण्याची वाढती मागणी, तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन, यामुळे सध्या धरणांतील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या सात धरणांत एकूण तीन लाख ८८ हजार ९७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्के जास्त असला तरीही पाणीचिंता कायमआहे.आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होईल.
घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका.

त्याऐवजी भांड्यामध्ये पाणी घेऊन कामे उरकावीत.वाहने धुण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसा. घरातील लादी, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.वॉशिंग मशिनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास मशिनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो. नळ यांचा प्रवाह मर्यादित करणाऱ्या तोटी (नोझल) लावून पाण्याची दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे.उपाहारगृहे, हॉटेलांमध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे, अथवा पाण्याची बाटली द्यावी.
सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात, कोठेही गळती आढळल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.