तीन वर्षाच्या लेकासमोर अमेरिकेतून आलेल्या वडिलांनी जीव सोडला, आयटी तंत्रज्ञाच्या सुखस्वप्नाचा अंत.

 पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत स्थायिक असलेल्या आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुट्टीसाठी पत्नी आणि मुलासोबत मायदेशी परतलेल्या बितान अधिकारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेमुळे कोलकात्यामध्ये शोककळा पसरली आहे.पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अमेरिकेत राहणाऱ्या आयटी तंत्रज्ञाच्या सुखस्वप्नाचा अंत झाला. फ्लोरिडाहून मायदेशी सुट्टी घालवण्यासाठी परतलेल्या ४० वर्षीय बितान अधिकारी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.मूळचे कोलकात्याचे बितान अधिकारी टीसीएसमध्ये आयटी तंत्रज्ञ होते. गेल्या दोन वर्षांपासून फ्लोरिडात राहत होते. पत्नी सोहिनी आणि तीन वर्षांच्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी ८ एप्रिल रोजी ते कोलकात्याला घरी आले होते. मागील आठवड्यात ते काश्मीरला गेले होते आणि गुरुवारी परतणार होते.

मात्र मंगळवारी दुपारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांची हत्या झाली. त्यांची पत्नी आणि मुलगा सुखरूप आहे.‘त्यांना आम्हा सर्वांना सोबत घेऊन जायचे होते. पण मी त्याला पत्नीबरोबर जायला सांगितले. मी मंगळवारी दुपारीही त्याच्याशी बोललो. त्यानंतर हे असे काय झाले?,’ असा हताश प्रश्न बितान यांच्या शोकाकुल पित्याने पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ‘मी सकाळीच त्याच्याशी बोललो होतो. काश्मीरहून परतल्यावर आपण जवळपास कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखू, असे त्याने सांगितले होते. पण ते आमचे शेवटचे बोलणे असेल, याची मला कल्पनाही नव्हती’, असे बितान यांच्या मोठ्या भावाने सांगितले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बितान यांच्या पत्नीशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

‘या दु:खाच्या क्षणी सांत्वन करण्यासाठी शब्द पुरेसे नाही. बितान त्यांचे पार्थिव कोलकात्यातील घरी आणण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे,’ असे आश्वासन बॅनर्जी यांनी दिले. पश्चिम बंगालचे मंत्री अरूप बिस्वास यांनी कोलकात्यातील निवासस्थानी या कुटुंबाची भेट घेतली. बितान यांचे पार्थिव लवकरात लवकर परत आणण्यासाठी राज्याचा गृह विभाग आणि नवी दिल्लीतील निवासी आयुक्त गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकार यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले.दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांवर गोळीबार केला. गोळीबार करण्याआधी त्यांना धर्म विचारण्यात आला, नमाज पढायला सांगण्यात आलं, मात्र ज्यांना नमाज अदा करता आलं नाही, अशा पुरुषांवर त्यांच्या पत्नी, मुलांसमोर गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.