ऑस्कर विजेत्या संगीतकारावर छळाचे आरोप, रिॲलिटी शोवर भडकली गायिका.

लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या एका गायिकेने ऑस्कर विजेत्या भारतीय संगीतकारावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.दाक्षिणात्य संगीत विश्वातून एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ‘पडुथा तियागा’सारख्या रिॲलिटी शोसाठी प्रसिद्ध असलेल्या एका गायिकेने संगीत विश्वातील दिग्गज मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. गायिका असे या गायिकेचे नाव असून, तिने ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावनी, गीतकार चंद्रबोस आणि गायिका सुनीता यांच्यासह संगीत उद्योगातील प्रमुख व्यक्तींवर गंभीर आरोप केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने या कार्यक्रमातील तीन परिक्षकांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आणि पक्षपातीपणाद्वारे छळ केल्याचा आरोप केला.गायिकेचा असा दावा आहे की, एमएम कीरावानी यांनी तिला चांगले गुण तेव्हाच दिले, जेव्हा तिने त्यांची गाणी गायली.

प्रवास्तीने असा आरोप केला आहे की, ती लग्नात गाण्यांचे सादरीकरण करते असे जेव्हा तिने सांगितले, तेव्हा कीरावानी यांनी असे उत्तर दिले की त्यांना असे गायक केवळ आवडत नाहीत असे नाही, तर ते त्यांचा द्वेष करतात. तर चंद्रबोस यांच्याबद्दल, प्रवास्तीने आरोप केला की त्यांनीदेखील स्वतःच्या गाण्यांवरुंन स्पर्धकांचे परिक्षण केले. त्यांची गाणी गाणाऱ्यांना पसंती दिली आणि इतरांना वगळले. कीरावनी आणि चंद्रबोस यांच्यावर तिने पक्षपातीपणाचे आरोप केले, तर गायिका सुनीता यांनी अपमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप प्रवास्तीने केला आहे. प्रवास्तीने आणखी एक खळबळजक दावा केला की, शोच्या निर्मिती टीमने तिला अनेकदा पोट उघडे राहील, असे कपडे घालण्यासाठी दबाव आणला होता.

ज्यामुळे तिला नेहमी अस्वस्थ वाटायचे.एमएम कीरावनी एक प्रसिद्ध भारतीय संगीतकार, गायक आणि गीतकार आहेत ज्यांनी तेलुगू, हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे. १९६१ मध्ये जन्मलेल्या कीरावानी यांनी १९९० च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांनी ‘बाहुबली’ चित्रपट सीरिज आणि ‘आरआरआर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह शेकडो चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. ‘आरआरआर’ मधील ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी त्यांना २०२३ मध्ये गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर सारखे पुरस्कार मिळाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.