बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…

 तेलंगणात एका महिलेने आपल्या प्रियकरासाठी पोटच्या तीन मुलांची हत्या केली आहे. प्रियकरासोबत राहता यावं म्हणून या महिलेने दह्यात विष मिसळून आपल्या मुलांना खाऊ घातलं.एक आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, त्यांची काळजी घेते, त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असते, अशी अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली असतील. पण, तेलंगणातील एका आईने जे केलं त्याने सारेच हादरले आहेत. या आईने आपल्या प्रियकरासाठी पोटच्या तीन मुलांना विष देऊन संपवलं आहे.तेलंगणातील संगारेड्डी येथील अमीनपूरमध्ये एका महिलेने आपल्या तीन मुलांना विष देऊन संपवल्याचा आरोप आहे. रजिता नावाच्या 45 वर्षीय आईने प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. मात्र, या घटनेचा उलगडा आता झाला आहे.12 वर्षांचा साई कृष्णा, 10 वर्षांचा मधु प्रिया आणि 8 वर्षांचा गौतम अशी मृत मुलांची नावं आहेत.

स्थानिकांनी सुरुवातीला या घटनेला कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं होतं. मात्र, पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक उलगडा करण्यात यश आलं आहे.या प्रकरणाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेट टुगेदर दरम्यान रजिताची तिच्या शाळेतील मित्रासोबत पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर या दोघांचे प्रेम प्रकरण सुरु झाले. आता रजिताला आपल्या नव्या प्रियकरासोबत आयुष्य जगायचं होतं. म्हणून तिने एक भयंकर योजना आखली.प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप आहे. २७ मार्च रोजी रजिताने जेवणात वाढलेल्या दह्यात विष मिसळलं होतं. मात्र, तिचा पती चेन्नय्या काहीही न खाता उपाशीच ड्युटीवर निघून गेला.

पण, तिन्ही मुलांनी ते विषारी दही खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी चेन्नय्या जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला तिन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तर, पत्नी रजिता ही पोटदुखीची तक्रार करत होती.पोटदुखीची तक्रार करणाऱ्या रजिताला तिच्या पतीने रुग्णालयात नेले. सुरुवातीला चेन्नय्याने सर्वांना विष देऊन घर सोडले असावे, असे पोलिसांना वाटले. पण, आता जेव्हा पोलिसांनी याचा कसून तपास केला तेव्हा पोलिसांना रजिताची योजना आणि या घृणास्पद कृत्यामागील तिचा हेतू समजला. हा प्लान ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.