पाच वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, बॉडी आईच्या कुशीत टाकत आरोपी म्हणाले – घे! तुझा मुलगा मेला.

 जमिनीच्या वादातून एका ५ वर्षांच्या चिमुकल्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर या आरोपींनी त्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या कुशीत टाकलं.जमिनीच्या वादातून एका 5 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात रिफायनरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चकबल्ली गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या आईच्या कुशीत आणून टाकला आणि घे तुझ्या मुलाला मारलं असं आरोपींनी सांगितल्याचाही आरोप आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून ठेवला आहे.

अनमोल सिंगचा मुलगा गोलू कुमार असं मृत ५ वर्षांच्या चिमुकल्याचं नाव असल्याची माहिती आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गोलू घरातून 10 रुपये घेऊन दुकानात बिस्किट घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर शेजारील बाळकृष्ण सिंह यांच्या कुटुंबीयांनी त्याला घरात ओढून नेले आणि डोक्यात धारदार वस्तूने वार करून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी महिलेने मुलाचा मृतदेह उचलून त्याची आई रिंकू देवी यांच्या कुशीत ठेवला आणि म्हणाली, बघ तुझा मुलगा मरण पावला आहे.कुटुंबीयांनी सांगितले की, बाळकृष्ण सिंह यांच्या कुटुंबात दोन कठ्ठा आणि 15 धुर जमिनीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

हे प्रकरण कोर्टातही आहे आणि यापूर्वीही अनमोल किंवा त्याच्या मुलाला मारून टाकू, अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या.या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी गावचा रस्ता काही काळ रोखून धरला आणि गोंधळ घातला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून शांत केले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला.या घटनेबाबत एसपी मनीष यांनी सांगितले की, एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, हा मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.