बाबासाहेब आगे हत्या प्रकरणाला वेगळे वळण, आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, त्याने माझ्यावर…

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे किटी आडगाव ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगे यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी नारायण फफाळने पोलिसात गुन्हा कबूल केला असून, संशयातून खून केल्याचे समोर येताना दिसत आहे. आता आरोपीच्या पत्नीने मोठे सत्य सांगितले आहे. बीडच्या माजलगाव येथे बाबासाहेब आगे यांचा निर्घृण खून करण्यात आला. हैराण करणारे म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे बाबासाहेब आगे सदस्य होते आणि ते भाजपाचे कार्यकर्त्ये देखील होते. आरोपीने बाळासाहेब आगे यांचा खून करून थेट पोलिस स्टेशन गाठले आणि खून केल्याचेही सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी नारायण फफाळ याला ताब्यात घेतले.

आता आरोपी नारायण फफाळच्या पत्नीने मोठा खुलासा केलाय. बाबासाहेब आगे याचा संशयातून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नारायण फफाळच्या पत्नीने म्हटले की, माझा नवरा खूप जास्त संशयी होता. तो गावातल्या कोणासोबतही माझे नाव जोडत होता. त्याला दारूचे व्यसन होते. घरी येऊन तो मला मारहाण करत आणि शिव्या देत. दोन मुलींच्या जन्मानंतर त्याचा संशय अधिक वाढला. फक्त बाबासाहेब आगेच नाहीतर तो गावातील कोणत्याही माणसावरून माझ्यावर संशय घ्यायचा.बाबासाहेब आगे माझ्या भावासारखा होता. माझे आणि त्यांचे बहीण भावाचे नाते होते. मी फक्त माझ्या सासू सासऱ्यांमुळे इथे राहिले. त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि ते माझ्यासोबत आहेत.

माझा नवरा दारू पिऊन घरी यायचा मला मारहाण करायचा आणि आई वडिलांनाही शिवीगाळ करायचा. बाबासाहेबाची हत्या त्याने संशयातूनच केली. मला ज्यावेळी तो दारू पिऊन येऊन मारहाण करायचा त्यावेळी गावातील लोक मध्यस्थी करायचे.बाबासाहेब आगे यांनीही बऱ्याचदा मला मारहाण करताना मध्यस्थी केली आहे. ही हत्या त्याने संशयातूनच केली, माझे आणि बाबासाहेब आगेचे काहीच नव्हते, तो माझ्या भावासारखा होता, असे आरोपी नारायण फफाळच्या पत्नीने सांगितले. बाबासाहेब आगेच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. किती क्रूरपणे आरोपी नारायण फफाळ बाबासाहेब आगेंना मारत आहे, हे व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर आरोपीने थेट व पोलिस स्टेशन गाठले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.