कौतुकास्पद ! बीडमधील तरूणानं बायकोचं सोनं मोडत मिटवली गावकऱ्यांची तहान, Video व्हायरल.

बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत.बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावे लागते यातच जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. गावातल्या लोकांच्या घशाला कोरड पडली आहे आणि त्यांना मैलोन मैल जाऊन पाणी मिळत नाही, त्यात घरच्या प्रत्येकाच्या लक्ष्मीची पायपीट एका तरुणाला बघवली नाही. यासाठी त्याने थेट आपल्या बायकोचं सोनच मोडलं आणि बनला एका गावात सह पाच गावांचा जलदूत. राजेश काकडे हे या तरुणाचे नाव आहे.

राजेश काकडे बीड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरूड गावचा हा रहिवासी. थोडाफार शिकलेला मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला गावची तहान भागवण्यासाठी यांना थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतला आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची ताण देखील या बोरवेलवर भागवली. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्याने अजून एक बोर घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्प मुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागते हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जात आहे.राजेश स्वतःची बाजरी डाळिंब आणि मोसंबीचं पीक हे वाया जाऊ दिले. कारण पाणी गावाला देण्यासाठी त्यांनी शेताला पाणी दिलेच नाही.

यामुळे हे पूर्ण शेती आणि लाखोंचा खर्च मातीमोल झाला मात्र तयारी ही त्याने हार मानली नाही आणि आपलं संकल्प अविरत पार पाडत राहिला यामुळे जरूर गावातील सरपंचासह नागरिकांनी त्याचा कौतुक तर केलंच आहे मात्र त्याला जलदूत अशी उपाधी देखील दिली आहे.खरंतर पाणी वाटपासाठी घेतलेला बोर आजही चालतोय आणि त्यासोबत अजून एक बोर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी घेतला आहे. मात्र यामध्ये कोणाचीही आर्थिक मदत न घेता हा त्याचा संकल्प राजेशने पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोरमुळे गावकऱ्यांसह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिली आहे” जो लोकांसाठी करतो त्याला देव साथ देतो “ही म्हण खोटी नाही हे राजेश कडून पाहून कळतं. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.