रणजीत कासलेंचे अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना…

 पोलिस दलातून हकालपट्टी झालेले रणजीत कासले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निवडणुकीत पैसे पाठवल्याचा आरोप केला, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. अट्रासिटीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कासलेंनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आलेले पीएसआय रणजीत कासले मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी परराज्यात जाऊन कोट्यावधी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी रणजीत कासले यांना अगोदर निलंबित करण्यात आले. निलंबणाची कारवाई झाल्यानंतर रणजीत कासले हे सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत होते. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. हेच धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या वेळी दहा लाख आपल्या अकाऊंटला पाठवल्याचा दावाही त्यांनी केला.रणजीत कासले विरोधात बीडमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात होती.

शेवटी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुण्यात दाखल झाल्यानंतर रणजीत कासले यांनी काही धक्कादायक खुलासे केले. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्याबद्दलही अतिशय धक्कादायक असा खुलासा केला.रणजीत कासले tv9 मराठीशी बोलताना म्हणाले की, अंजली दमानिया यांची हिस्ट्री तुम्ही अगोदर काढा. कोण होत्या काय होत्या. अंजली दमानिया यांची सर्वांची एक टीम होती. आम आदमी पार्टीचे हे पूर्वीचे कार्यकर्त्ये होते. मी मुंबईला होतो ना तर मला यांचे सर्व माहिती आहे. काही जे अंजली दमानिया यांच्यासारखे असतात ना हे भ्रष्ट आहेत.

जेव्हा काही प्रकरण उचलायचे, त्याचे कागदपत्रे काढायची त्यासाठी त्यांनी दहा माणसे ठेवलेली आहेत.मंत्री, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपत्ती बाहेर काढायच्या, त्यांचे काही संबंध काढायचे आणि पुरावे गोळा करायचे. मग तोडपाणी करायचे जे काही आहे ते. रणजीत कासले म्हणाले की, मी जे जे आरोप केले, त्याची चाैकशी व्हावी ही माझी मागणी आहे. मला निलंबित केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये माझा राग गेला असल्याचेही रणजीत कासले यांनी म्हटले आहे. यावेळी बरेच मोठे खुलासे करताना कासले दिसले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.