जोरदार धडक अन् २०० मीटर फरफटत नेलं, पती-पत्नीचा हादरवणारा अंत, संतप्त गावकऱ्यांनी गाडी फोडली.

रायगडमध्ये एका इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर या इनोव्हाने दुचाकीला फरफटत नेलं. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रायगडच्या अलिबाग येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मानीफाटा येथे रेवस बाजूकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने त्याच्या पुढे असणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील विश्वास पाटील (वय ४७) व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात इनोव्हा कारने मोटरसायकलला २०० मीटर फरफटत नेलं.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील खडताळ पूलपासून रेवस बाजूकडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एम एच ०२ डी जे ८१२१ ही भरधाव वेगात होती.

सदर इनोव्हा वरील चालक हा त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन मानी फाटा नजिक असलेल्या मसाला मिल येथे आली असता पुढे जाणारी मोटर सायकलला जोरदार धडक दिली.धडकेत इनोव्हा कार चालकाने धडक दिलेली दुचाकी २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेली.या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले, त्यांनी दुचाकीला धडक दिलेल्या इनोव्हा कारची तोडफोड करत काही काळ वाहतूक रोखून धरली असल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी इनोव्हा कारचालकाला ताब्यात घेतलं असून जमावाला देखील शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

या अपघातातील जखमी पती पत्नी यांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील दाम्पत्य अलिबागहून रेवसकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी जमाव संतप्त झाला असल्याने अलिबाग पोलिसांनी अधिक फौजफाटा मागवून जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.अलिबाग रेवस या रस्त्यावर गेल्या चार महिन्यात पंचवीसहून अधिक अपघात झाले असून चार-पाच जणांनी नाहक जीव गमावला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण होणे हे गरजेचे आहे, असं मत अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल चोपडा यांनी व्यक्त केलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.