आई मी खेळायला जाते…,घराबाहेर पडताच चिमुकलीवर शेजाऱ्याने केला अत्याचार, मोठी खळबळ.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी घराबाहेर खेळायला गेली असताना आरोपीने तिला घरात ओढून तिच्यावर अत्याचार केला. जिन्सी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या पाच वर्षांच्या मुलीवर ३८ वर्षांच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. ज्यानतंर मोठी खळबळ निर्माण झाली. या प्रकरणात लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या शफीक खान हनिफ खान (वय ३८, रा. जिन्सी परिसर) याला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पीडितेच्या आईने जिन्सी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सदर महिला विभक्त आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. सदर महिला पाच वर्षांच्या मुलीसोबत राहते. महिला ही तिच्या मुलीसोबत घरात होती.

१६ एप्रिल रोजी पीडिता ही खेळायला जाते सांगून घरातून बाहेर गेली. अर्ध्या तासातच पीडिता घरी रडत आली. तिने आल्यावर आईला घडलेला प्रसंग सांगितला. ‘नराधम शफीक खान याने पीडितेला घरात ओढले व तिच्याशी अंगलट करून तिच्यावर अत्याचार केला,’ असे मुलीने सांगितले.पीडिता मोठ्याने ओरडल्याने त्याने तिला सोडून दिले. प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून आरोपी शफिक खान याच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्यान्वये जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जी. एस. माने करीत आहेत. आरोपी शफीक खान हनीफ हा सध्या पोलिस कोठडीत असून त्याची कसून चाैकशी ही पोलिसांकडून केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.जिन्सी पोलिस ठाण्यात महिलेने पाच वर्षाच्या मुलीसोबत अत्याचार झाल्याची तक्रार देताच, जिन्सी पोलिसांनी तत्काळ नराधाम शफीक खान हनीफ याला ताब्यात घेतले. शफीक खान याला १७ एप्रिल रोजी कोर्टात हजर केले. १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. दुसरीकडे जालन्यात सलग चौथ्यांदा मुलगी झाल्यामुळे जन्मदात्या माता-पित्यांनीच तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. आई वडिलांनी देखील आपला गुन्हा कबूल केलाय. पवार दाम्पत्याला तीन मुली होत्या आणि चाैथी देखील मुलगीच झाल्याने ते निराश झाले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.