लहान मुलाशी अनैसर्गिक संबंध ठेवताना पाहिलं, तरुणाने १६ वर्षांच्या मुलाला संपवलं, भिवंडीतील घटनेचं गूढ 5 वर्षांनी उकललं.

अन्य एका लहान मुलासोबत असलेले अनैसर्गिक संबंध पीडित मुलाने पाहिले होते. तो सर्वांना सांगेल, या भीतीपोटी शेखने त्याची हत्या केल्याची माहिती आहेभिवंडीतील १६ वर्षांच्या अपहृत अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची बाब तब्बल पाच वर्षांनी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालमत्ता गुन्हे कक्षाने उत्तराखंड येथून एकाला अटक केली आहे. गुलाब ऊर्फ गुलाम रब्बानी शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे अन्य एका लहान मुलासोबत असलेले अनैसर्गिक संबंध पीडित मुलाने पाहिले होते. तो सर्वांना सांगेल, या भीतीपोटी शेखने त्याची हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. ‘पोक्सो’च्या अंतर्गत अटकेत असलेल्या शेखला न्यायालयाने १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.भिवंडीतील नेहरूनगर, नवी वस्ती परिसरातून २० नोव्हेंबर २०२० रोजी १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेल्या शेख याच्या विरोधात २०२३ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला.या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे कक्षाकडूनही सुरू होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी गुलाम उत्तराखंडमध्ये मशिदीमध्ये स्वत:चे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उत्तराखंडमधून आरोपीला ताब्यात घेत पोक्सोच्या गुन्ह्यात अटक केली.या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये गुलाम यानेच अपह्रत मुलाची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. हत्येनंतर त्याने मुलाचा मृतदेह तो चालवित असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूच्या गाळ्यामध्ये पुरला होता.

संबधित गाळ्यातील बाथरुमधील टाइल्स खोदल्यानंतर त्याठिकाणी मुलांच्या हाडाचे अवशेष मिळाले.दरम्यान, भिवंडीमध्ये हत्येचे सत्र सुरुच असून बांधकाम व्यावसायिक फरहत इकलाक शेख (५२) यांचा कारीवली गाव येथील जंगल परिसरात मंगळवारी मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये शेख यांचा मृत्यू डोक्यात हत्याराने वार केल्याने परिणामी जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.