सर्वोच्च न्यायालय ‘सुपर पार्लमेंट’ बनू शकत नाही; असं का म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड.

दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोकड प्रकरणाचा संदर्भ देत, धनखड यांनी न्यायपालिकेवर टीका केली.विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपतींसाठी कालमर्यादा निर्धारित करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले. ‘सर्वोच्च न्यायालय ‘सुपर पार्लमेंट’ बनू शकत नाही. राष्ट्रपतींना आदेश देऊन न्यायालय लोकशाही शक्तींवर अण्वस्त्र डागू शकत नाही,’ अशी टिप्पणी धनखड यांनी केली.राज्यसभेच्या प्रशिक्षणार्थींच्या कार्यक्रमाला संबोधित करताना धनखड यांनी न्यायपालिकेला लक्ष्य केले. ‘राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे.

राष्ट्रपती संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतात. न्यायपालिकेला संविधानाच्या कलम १४५ (३) अंतर्गतच संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे आणि तेही फक्त पाचपेक्षा अधिक न्यायाधीशांच्या घटनापीठाद्वारेच करता येते. मात्र, न्यायपालिकेसाठी राज्यघटनेतील कलम १४२ हे लोकशाही शक्तींविरुद्धचे एक अण्वस्त्र बनले आहे,’ अशी टीका धनखड यांनी केली.दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोकड प्रकरणाचा संदर्भ देत,

धनखड यांनी न्यायपालिकेवर टीका केली. या घटनेला एक महिना उलटला आहे. तीन न्यायाधीशांची समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. परंतु ही समिती भारतीय संविधानाच्या अंतर्गत आहे का, तीन न्यायाधीशांच्या समितीला कायद्यानुसार मंजुरी आहे का, असे प्रश्न विचारत या प्रकरणी गुन्हा का नोंदवला नाही, असा प्रश्न त्यांनी केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.