ट्रम्प सरकारची नवी खेळी; विदेशी विद्यार्थ्यांबाबत हार्वर्ड विद्यापीठाला नवा इशारा, गृहमंत्र्यांच्या पत्राने टेन्शन वाढलं.

अनुदान आणि करार गोठवल्यानंतर आता प्रशासनाने विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा व हिंसक कृत्यांचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासनामधील वाद वाढतच चालल्याचे चित्र आहे. अनुदान आणि करार गोठवल्यानंतर आता प्रशासनाने विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा व हिंसक कृत्यांचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा अधिकार रद्द करण्याचा इशारा विद्यापीठाला देण्यात आला आहे.गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी यासंदर्भात हार्वर्ड विद्यापीठाला खरमरीत पत्र लिहिले आहे. ३० एप्रिलपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थी व्हिसाधारक विदेशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा व हिंसक कृत्यांबद्दलच्या तपशीलवार नोंदी सादर करा, अन्यथा ‘स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम’ (एसईव्हीपी) नोंदणी त्वरित रद्द केली जाईल, असे या पत्रात नमूद आहे.‘हार्वर्डच्या निष्क्रिय नेतृत्वाने ज्यूद्वेष्ट्यांपुढे गुडघे टेकले आहेत.

त्यामुळे दहशतवाद्याकडून दंगलींचे वातावरण निर्माण केले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. अमेरिकाविरोधी व हमासला पाठिंबा देणाऱ्या विचारधारेने विद्यापीठाचा कॅम्पस आणि वर्गखोल्या दूषित झाल्या आहेत. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केल्यापासून या विद्यापीठातील विदेशी व्हिसाधारक निदर्शनकर्ते आणि प्राध्यापक ज्यू विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात द्वेष पसरवत आहेत. करदात्यांच्या पैशांतून चालणाऱ्या विद्यापीठांकडून अमेरिकेला वेगळ्या अपेक्षा आहेत’, असे नोएम यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘तब्बल ५३.२ अब्ज डॉलर्सच्या देणग्यांतून हार्वर्ड स्वतःचा कारभार चालवू शकते. गृहमंत्रालय यासाठी साह्य करणार नाही. प्रशासनाने मागितलेल्या तपशिलाची पूर्तता न केल्यास हे विद्यापीठ विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विशेषाधिकार गमावेल’, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.हार्वर्ड विद्यापीठाला दिली जाणारी २७ लाख अमेरिकी डॉलर्सची दोन अनुदाने रद्द केल्याची घोषणा गृहमंत्री नोएम यांनी बुधवारी केली. हे विद्यापीठ करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर करण्यास पात्र नसल्याचे त्यांनी ही घोषणा करताना नमूद केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.