आसाममध्येही ‘जामतारा पॅटर्न’! क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा, पाच जणांना अटक.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आसामच्या मोरगाव जिल्ह्यातील ‘जामतारा पॅटर्न’ उघडकीस आणला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आसामच्या मोरगाव जिल्ह्यातील ‘जामतारा पॅटर्न’ उघडकीस आणला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळीने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डवर ५५ क्रेडिट कार्ड घेतल्याचे समोर आले आहे.फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधीत सुमारे ५५ जणांनी एक कोटी २६ लाख थकविल्याचे ‘एचएसबीसी’ बँकेच्या तपासणीत समोर आले. या थकबाकीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात असताना त्यांनी बनावट ओळखपत्रांवर क्रेडिट कार्ड घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

या प्रकार समोर येताच बँकेचे नयन भगदेव यांनी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.बँक खात्यांचा तपशील, क्रेडिट कार्ड वापरल्याची ठिकाणे, गुन्हा करताना वापरलेले मोबाइल क्रमांक याचा बारकाईने अभ्यास करीत ही टोळी आसाममध्ये सक्रिय असल्याचे समजले. निरीक्षक शामराव पाटील, प्रशांत गावडे यांच्यासह आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, युवराज देशमुख यांच्या पथकाने आसाममधील गावे पिंजून काढत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.मोरगाव जिह्यातील अमरागुरी, लालीपत्थर, हत्यारबोरी, तातीपोरा, कारीमरी या गावात दिवसरात्र ठाण मांडून आणि रात्रीच्या वेळी शोध मोहीम घेत पोलिसांनी पाच जणांची धरपकड केली. या जिल्ह्यातील गावागावातील तरुणांना सायबर गुन्ह्यांचे धडे देण्यात आले आहेत.

दोनशे- पाचशे मीटरवर कुणी अनोळखी दिसल्यास या गुन्हेगारांपर्यंत माहिती पोहोचते आणि ते गायब होतात. दिवसात हे चोर हाती लागतच नाही, रात्रीच्या वेळी तर चोरांचे वास्तव्य शोधणे त्याहून कठीण असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.या टोळीचे प्रमुख लक्ष्य वित्तसंस्था, बँका असल्याचे पुढे आले आहे. ही टोळी सिबिल स्कोर चांगला असलेल्या व्यक्तींचा डेटा मिळवते. त्या व्यक्तींच्या नावे आणि त्याच्या ओळखपत्राप्रमाणे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करते. यावेळी आपली ओळख समोर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या क्रेडिट कार्डवर ऑनलाइन खरेदी किंवा काही रक्कम खात्यामध्ये वळती करतात. या टोळीने अशाप्रकारे आदित्य बिर्ला फायनान्स, एलटी फायनान्स, ऍक्सिस बैंक तसेच इतरही अनेक संस्थांची फसवणूक केली आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.