पुण्याचे धडाकेबाज निवृत्त एसीपी, स्वारगेटला जाताना अचानक झाडावरुन बाईकवर केबल पडली अन्…

हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे जात असताना, अचानक रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडाला गुंडाळलेली केबल त्यांच्या अंगावर पडलीटिळक रस्त्यावर हिराबाग चौकाजवळ झाडाला बांधलेली केबल दुचाकीत अडकून झालेल्या अपघातामध्ये निवृत्त पोलिस अधिकारी अरविंद पाटील जखमी झाले. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अरविंद पाटील (वय ६८, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धोकादायक पद्धतीने झाडावर केबल लोंबकळत ठेवणारा व्यक्ती; तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे पुणे पोलिस दलातून सहायक पोलिस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सेवा कालावधीत त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते.

पाटील आणि त्यांचे मित्र सोमवारी (१४ एप्रिल) सकाळी नेहमीप्रमाणे सारसबागेजवळील उपाहारगृहात गेले होते. तेथून ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्या वेळी हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे जात असताना, अचानक रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडाला गुंडाळलेली केबल त्यांच्या अंगावर पडली.ती केबल दुचाकीच्या चाकात गुंडाळली गेल्यामुळे पाटील यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. दुचाकी त्यांच्या अंगावर पडली. या अपघातामध्ये पाटील यांना दुखापत झाली.अपघात झाल्याची माहिती मिळताच निवृत्त पोलिस अधिकारी दत्तात्रय टेमगिरे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये पाटील यांच्या हाताच्या एका बोटाच्या नसांना गंभीर दुखापत झाली. उपचारानंतर पाटील यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दुसरीकडे, गुजरातमधील राजकोट शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर बुधवारी सकाळी महापालिकेच्या भरधाव जाणाऱ्या बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.वर्दळीच्या भागातील ट्रॅफिक सिग्नलवर इलेक्ट्रिक बसने दुचाकी आणि कारसह वाहनांना धडक दिल्याचे क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) फुटेजमध्ये दिसत आहे. राजकोट महापालिकेच्या इलेक्ट्रिक सिटी बसला अपघात झाला.
‘या बसने दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांसह अनेक वाहनांना धडक दिली,’ अशी माहिती परिमंडळ २चे पोलिस उपायुक्त जगदीश भिंगारवा यांनी दिली. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.