पालघरमध्ये चक्क एका विवाहितेने घरात घुसलेल्या चोरांशी दोन हात केले. विशेष म्हणजे त्यापैकी एकाला मोठ्या धाडसाने पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले.चित्रपटात नायक आणि चोरांमध्ये झटापट होते, हे आपण बऱ्याचदा पाहिले आहे. पण, पालघरमध्ये चक्क एका विवाहितेने घरात घुसलेल्या चोरांशी दोन हात केले. विशेष म्हणजे त्यापैकी एकाला मोठ्या धाडसाने पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीत ही विवाहिता किरकोळ जखमी झाली असून, दुसरा चोर मात्र दागिने घेऊन पसार झाला आहे. मात्र, या विवाहितेच्या धाडसाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.काजल चौहान असे या विवाहितेचे नाव आहे. पालघर नगर परिषद क्षेत्रातील टेंभोडे गावच्या आदर्श नगर वसाहत येथील वसंत विला गृह संकुलात ती कुटुंबासोबत राहते. सोमवारी काजल पतीसह शिरगाव येथे फिरायला गेली होती. तिथून रात्री उशिरा आल्यानंतर काजलचे पती गाडी पार्क करत होते, तर काजल तोपर्यंत घरी आली. त्यावेळी एक व्यक्ती तिला त्यांच्या घरातून बाहेर पडताना दिसली.










