२५ वर्षीय नराधामाचा ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : चोपडा हादरले !

खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही घटना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोरगावले रस्त्यावरील एका शेतातील झोपडीत घडली. यावेळी संतप्त जमावाकडून अत्याचार करणाऱ्या नराधमाची धुलाई केली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील गोरगावले रोडवर असलेल्या झोपड्यांमध्ये मध्यप्रदेशातील परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे. याच ठिकाणी राहत असलेल्या २५ वर्षीय मयाल (मूळ रा. पिंपऱ्यापाणी ता. वरला, जि. बडवानी) याने शेजारी राहत असलेल्या पाच वर्षीच चिमुकलीचे आई वडील घरी नसल्यामुळे तीला खाऊ देण्याचे अमिष दाखवून घरात बोलाविले. त्यानंतर चिमुकलीवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या नराधमापासून चिमुकलीची सुटका केली.

कामासाठी आलेले चिमुकलीच कुटुंब हे एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. या प्रकाराबाबत त्यांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली, त्यांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले. तर संतप्त जमावाने अत्याचार करणाऱ्या नराधमाची धुलाई केली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत त्या नराधमाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविले.  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.