गिराणा नदी पात्रातून होणारी वाळू चोरीची वाहतूक जामनेर शहरात गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या संदर्भात जिल्हा आणि तहसील प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे.गेल्या अनेक दिवसांपासून रात्री 9 वाजेपासूनच नेरी मार्गे जामनेर आणि आस पास च्या खेड्या पाड्यात सर्रास डंपरद्वारे अवैधपद्धतीने रेतीची तस्करी सुरू आहे. या संदर्भात अनेकदा जामनेर चे तहसीलदार यांना माहिती देखील देण्यात आली आहे.

तहसीलदार यांनी नेमून दिलेल्या पथकास देखील वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. ही कारवाई जाणून बुजून केली जात नसल्याची सध्या शहरात सुरू आहे. अवैध वाळूची वाहतुक ही प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देखील संपर्क केला असता त्यांनी देखील फोन न घेणेच पसंत केले.त्यामुळे वाळू तस्करी करणाऱ्यांवर खरच प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही न अशी शंका जनतेच्या मनात येत आहे.
वाळू माफियांना कडून सरकारचा लाखो रुपयांचा महसुल बुळत असून जिल्हाचे जिल्हाधिकारी आणि स्थानीक तहसील प्रशासनाच्या वतीने काही कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.म्हसावद ते जामनेर इतक्या लांबून रात्रीच्या वेळेस वाळू चोरून आणून विकली जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वाळू माफियांवर लक्ष देण्याची मागणी जामनेर तालुक्यातील वाहनधारकांनी केली असून त्यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्व जामनेर वासियांचे लक्ष लागून आहे. म्हसावद,नेरी ते जामनेर अशा मार्गाने ही वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून काही लोक हफ्ते खोरी करत असल्याची चर्चा देखील सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे. अशा हप्ते खोरांवर्ती कारवाई झाली पाहिजे.अशी भावना नागरिकांन मधून व्यक्त होत आहे तसेच जामनेर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का? असा ही प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.









