बीड जिल्हा रुग्णालयात भयंकर परिस्थिती, प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय धडपड.

जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा ही पूर्णपणे कोलमडली आहे. प्रसूती दरम्यान मातेच्या मृत्यू प्रकरणात त्रिसदस्य समितीबीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याची दखल घेत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.मात्र, या चौकशी समिती समोर जाण्याआधीच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. तसेच डॉक्टरांना वाचविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनीही फिल्डिंग लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

छाया पांचाळ या मातेचे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच सोमवारी सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात झालेल्या मातेच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यू आहे. जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे. डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार आहे. मात्र, आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण ठरलेल्या आवादा एनर्जी प्रकल्पावर एका टोळीकडून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल बीड पोलिसांनी केली असून दहा पैकी चौघांना अटक केली आहे. या टोळीवर बीड पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. 11 मार्च रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी झाली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्याच परिसरातील विडा येथील आवादा कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून मारहाण करत 11 लाख रुपयांचे साहित्य चोरी करण्यात आले होते. या दरम्यान चोरट्यांनी लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले होते. पोलिसांनी याचा तपास करत या टोळीतील दहा पैकी चौघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले असून या टोळीवर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत असून टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला गेलाय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.