अंघोळ-कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकासह मावशीचा बुडून मृत्यू ; अंजाळे शिवारातील घटना.

यावल तालुक्यातील अंजाळे येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात गावापासून जवळच असलेल्या तापी नदीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली सतीश भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल (वय ५, दोन्ही रा.अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंजाळे (ता. यावल) येथे घाणेकर नगरातील बादल भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी वैशाली भिल व सपना सोनवणे या दोन्ही बहिणी असून त्या अंजाळे येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. यामुळे बरेच जण अंजाळे येथे मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी वैशाली व सपना या नकुलला घेऊन गावापासून जवळच असलेल्या तापी नदीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले होते.

मुलाला घेऊन दोघी बहिणी नदीत उतरल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण नदीत बुडाले.दरम्यान नकुलची बहिण अनू धावत घराकडे आली आणि मामाला म्हणाली, नकुल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी आई व मावशीने पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, त्या पण पाण्यात दिसत नाही. ते ऐकताच सर्वजण नदीकडे धावत आले. मात्र, तोपर्यंत तिघे मृत झाले होते. याबाबत यावल पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत तपास केला. पोलिस पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.