मुलं होत नाही म्हणून पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न केलं, नवी नवरी येताच…; पुण्यात खळबळ.

पुण्यात एका व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करुन मुलीला घरी आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पती, सासू, सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पतीने दुसरं लग्न करून एका मुलीला घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून पती, सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी प्रविणकुमार सॅमियल गोलपल्ली (वय ३३), सासू जयम्मा सॅमियल गोलपल्ली (वय ५०) आणि सासरे सॅमियल ओबेय्या गोलपल्ली (वय ५४, रा. बालाजी निवास, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेचा प्रविणकुमार गोलपल्ली यांच्यासोबत साधारण २०२१ मध्ये विवाह झाला होता. मात्र तेव्हापासून त्यांना मुलं होत नव्हतं.यावरून प्रवीणकुमार हा आपल्या पत्नीचा छळ सतत करत होता. प्रविणकुमार तिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देत होता.पहिल्या पत्नीला मूल होत नसल्याने तो तिला त्रास द्यायचा. इतकंच नाही, तर त्याने पहिली पत्नी असताना देखील दुसरं लग्न करत दुसरी पत्नी घरात आणली. प्रवीण कुमार याने आणखी एका मुलीसोबत लग्न करून तिला घरात आणलं. या प्रकारामुळे फिर्यादीला मोठा मानसिक धक्का बसला. तिने याबाबत सासरच्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिची बाजू ऐकून न घेता उलट तिला त्रास देणं सुरूच ठेवलं.

अखेर असह्य झाल्याने पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांत जात पती, सासू यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी याप्ररकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.दरम्यान, पुण्यात मागील काही काळापासून हत्या, मारामारी, चोरी यासारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज काही ना काही कारणांनी गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असाच प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.