
पुण्यातील बुधवार पेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करत तिला तिच्याच मैत्रिणीने विकलं. पाच महिन्यांनी मुलीने तिथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात जात सर्व काही प्रकार सांगितला.पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशी महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली असली, तरीही सीमा ओलांडून महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. असाच एका प्रकारात, बांगलादेशची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडून पुण्यात आलेल्या १६ वर्ष २ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच मैत्रिणीने फसवून पाच लाख रुपयांना बुधवार पेठेतील ‘आक्का’कडे विकले. या मुलीवर पाच महिने बंद खोलीत ठेवून शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला. अखेर तिने तिथून पळ काढत पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवलं. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आणलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवस राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकले.तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलं.