पुण्यातील बुधवार पेठेतून ती थेट पोलिस स्टेशनला गेली, अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसही हादरले.

पुण्यातील बुधवार पेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करत तिला तिच्याच मैत्रिणीने विकलं. पाच महिन्यांनी मुलीने तिथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात जात सर्व काही प्रकार सांगितला.पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट  एरियामध्ये बांगलादेशी महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली असली, तरीही सीमा ओलांडून महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत.  असाच एका प्रकारात, बांगलादेशची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडून पुण्यात आलेल्या १६ वर्ष २ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच मैत्रिणीने फसवून पाच लाख रुपयांना बुधवार पेठेतील ‘आक्का’कडे विकले. या मुलीवर पाच महिने बंद खोलीत ठेवून शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला. अखेर तिने तिथून पळ काढत पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवलं. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आणलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवस राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकले.तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलं.

तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसाय जबरदस्तीने करायला लावला.पाच महिने अत्याचार सहन करूनही तिने योग्य संधी मिळताच ७ एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे वर्ग केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.

  • Related Posts

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    रविवारी रात्री उशिरा मिरा रोड येथील इंद्रप्रस्थ सोसायटीतून मोरे कुटुंबाला पिकअप केले. विवेक मोरे हे खाजगी क्षेत्रात नोकरी करतात. ते अपघातात बचावले, पण त्यांचा कॉलेजवयीन मुलगा निहार आणि त्यांची पत्नी…

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    पुणे वन विभाग सिंहगडासाठी लवकरच एक ॲप सुरू करणार आहे, ज्यामुळे पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग आणि गडावरील माहिती उपलब्ध होईल. यासोबतच, १ जूनपासून गडावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार असून, प्लास्टिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.