पशुवैद्यकीय अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला.

पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जाधव (वय 45) यांच्यावर एकाने धारदार शस्त्राने चेहर्‍यावर वार करून अर्वाच्य शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.22) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पंचायत समितीच्या पशु वैद्यकीय कार्यालयातच घडली. जाधव यांच्या फिर्यादीवरून अनिस सय्यद (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, पूर्ण नाव माहिती नाही) आणि अनोळखी दोन व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा, जबरी चोरी आणि जबर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

या फिर्यादीत म्हटले आहे, दि.20 एप्रिलला सकाळी 10 वाजता फिर्यादी डॉ. जाधव पंचायत समिती आवारातील दत्त मंदिराचे दर्शन घेवून मंदिरापासून कार्यालयाकडे जात असताना अनिस सय्यद म्हणाला की, मला प्रोटेक्शन मनी (खंडणी) द्यावी लागेल. त्यावेळेस फिर्यादीने त्यास स्पष्ट नकार दिला.

त्यानंतर दि.22 एप्रिलच्या सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कार्यालयात असताना अनिस सय्यद व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम (नाव, गाव माहीत नाही) डॉ.जाधव यांच्या कार्यालयात आले व म्हणाले की, तुला सांगितलेले पैसे तू का दिले नाही? असे म्हणत शिवीगाळ केली. एकाने धारदार वस्तुने चेहर्‍यावर मारहाण करुन फिर्यादीच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम व गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली व निघून गेला. पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनखाली शेवगाव पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.