गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन.

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन.: भारत सरकारच्या कामगर आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे ओला, उबर, रॅपिडो, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिकीट, ॲमेझाॅन, फ्लिपकार्ड, मिशो, यासारख्या प्लॅटफॉर्मवर बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोटा दिलासा मिळणार आहे.ई -श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे मोफत अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजना लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी, भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या नोंदणीव्दारे गिग, आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिक ओळख मिळेल.

आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हि नोंदणी आवश्यक आहे. याकरिता नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे वय १६-५९ असावे, तो आयकर भरणारा नसावा, ईपीएफओ व ईसआयसीचा सदस्य नसावा. तसेच आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेले मोबाल नंबर, बँक खाते तपशील. नोंदणीसाठी आवश्यक आहेत. गिग प्लॅटफॉर्म कामगारांना महा ई-सेवा केंद्र किंवा https://register.eshram.gov.in या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे तसेच दि. ७ एप्रिल २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत नोंदणी करण्याची सुविधा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी मिळणाऱ्या लाभाबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालय, पहिला मजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हा पेठ, जळगाव येथे संपर्क साधावा. तसेच संबंधीत कामगारांनी त्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी ई-श्रम पोर्टवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.