जळगावमध्ये आधार संच वाटपाबाबत लवकरच प्रक्रिया सुरू होणार.

जळगावमध्ये आधार संच वाटपाबाबत लवकरच प्रक्रिया सुरू होणार.

जळगाव, : जळगाव जिल्ह्यात 32 रिक्त महसुल मंडळात / शहरात आधार संच वाटप करण्याबाबत 24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच आधार संच वाटपाची प्रक्रिया 09 एप्रिल 2025 रोजी करण्यात येणार होती मात्र आता ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यांत येत आहे. या 32 रिक्त मंडळात आधार संच मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत.

तरी, आधार संच वाटपाची प्रक्रिया सुरळीत व्हावी व उत्कृष्ट सेवा देणा-या आपले सरकार सेवा केंद्र धारकांनाच आधार संच मिळावे, त्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी करणे, स्थानिक चौकशी करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी जळगाव, यांचे आदेशानुसार प्राप्त अर्जाची स्थानिक चौकशी करण्यासाठी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्ष्यतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

या समिती मार्फत चौकशी पूर्ण झाल्यावर आधार संच वाटपाची प्रक्रिया केली जाईल.
तरी, अगोदरच्या जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार दि.09 एप्रिल 2025 रोजी होणारी निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यांत येत आहे. प्राप्त अर्जाची समिती मार्फत चौकशी पूर्ण झाल्यानंतर, आधार संच वाटपाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.