महाराष्ट्र हादरला! नवऱ्याला सोडून विवाहिता लिव्ह इनमध्ये, चार वर्षात प्रियकरासोबत तिघा भावांकडून अत्याचार.

महिला लग्नानंतर नवऱ्याला सोडून पळून प्रियकरा सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. यावेळी प्रियकराच्या तीन भावांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोदंवली आहे.एका महिलेवर प्रियकऱ्याच्या तीन भावांनी ४ वर्षे अत्त्याचार केले असल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर येत आहे. महिला लग्नानंतर नवऱ्याला सोडून पळून प्रियकरा सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. यावेळी प्रियकराच्या तीन भावांनी चार वर्षे बलात्कार केला. याप्रकरणी चौघां विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित ३४ वर्षीय महिला आठव्या वर्गात शिक्षण घेत असताना शाळेची सहल सिद्धार्थ उद्यानात गेली होती. यावेळी तिची ओळख आताच्या प्रियकराशी झाली.

त्यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतरण प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना कळली. कुटुंबीयांनी मात्र २०१० मध्ये तिचे दुसऱ्यासोबत विवाह लावून दिला. वर्षा नवऱ्यासोबत वाळूज परिसरात तीन वर्ष राहीली. त्यानंतर ती २०१२ मध्ये प्रियकरासोबत पळून गेली. बजाज नगर येथे प्रियकराच्या कुटुंबासोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. प्रियकराच्या कुटुंबात आई मोठा भाऊ त्याची पत्नी दुसरा भाऊ व त्याची पत्नी असे एकत्र कुटुंब पद्धतीने राहू लागले. प्रियकरापासून वर्षाला तेरा वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ते आहेत.पीडितेच्या प्रियकराने रांजणगाव येथे स्वतःचे घर घेतले. २०१८ ते २०१४ तिथे दोघे जाऊ लागले. २०२० मध्ये प्रियकराचा मोठा भाऊ एका कार्यक्रमानिमित्त घरी आला. घरातील सर्व जण रात्री झोपी गेल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा संपूर्ण प्रकार प्रियकराला माहीत होता. त्याच्या संमतीने पुन्हा त्याच वर्षी त्याने संबंध प्रस्थापित केले. २०२२ मध्ये सुमितचा चुलत भाऊ हा रविवारचा दिवशी त्यांच्या रांजणगाव येथील घरी आला. चुलत भावाने प्रियकर घरी असताना पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हे सगळं माहीत असताना प्रियकर काहीच बोलला नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर प्रियकर संमितीने वर्षाला मारहाण करत शिवीगाळ करायला सुरुवात केली.मुलीच्या नावाने ब्लॅकमेल करत केला अत्याचार….२०२४ रांजणगाव येथील घरी सायंकाळच्या सुमारास प्रियकराचा तिसरा भाऊ आला. त्याने वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलीचे अंतर्वस्त्र काढत धमकी दिली. तुझ्यासोबत शरीर संबंध बनवू दे नाहीतर मी तुझ्या मुलीचे आयुष्य बरबाद करेल. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न समोर ठेवून बळजबरी वर्षावर अत्याचार केला. यावेळी व्हिडिओ देखील बनवला.या संपूर्ण प्रकरणाला वैतागलेल्या वर्षांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. वर्षाच्या फिर्यादीवरून प्रियकर व त्याच्या भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर…

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.