मुक्ताईनगरातील महामार्गालगत असलेल्या हॉटेलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या घोडसगाव येथील अर्जुन जनार्दन सांगळकर (कोळी) (वय २५) याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आल. ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईमुळे खळबळ माजून गेली आहे.
जिल्ह्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मांडले होते. जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तितकेच नव्हे तर खुन व अन्याय, अत्याचार, चोरी अशा गुन्ह्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आठवड्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे एकाचा खून करण्यात आला होता गेल्या महिन्यात मुलींच्या छेडखानीचे प्रकारही झाले होते. या प्रकारांमुळे मात्र खरोखरच तालुका व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे.










