चालक नसताना सुरू झाली ST, बसमध्ये असंख्य विद्यार्थी, काळ समोर असतानाच पोलिसाचं धाडस अन्..

बस स्थानकावरील एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाश्यांचे प्राण वाचले आहेत.नवापूर बस स्थानकावरील एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी दोन विद्यार्थिनी जखमीही झाल्या मात्र एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचले आहेत. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.नवापूर बसस्थानक परिसरात नेहमी प्रमाणे १२ ते १२:३० चा दरम्यान नवापूर- भोमदीपाडा M.H १४. B T २११४ ही बस उभी होती त्या बस मध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानका समोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहे तर दुकान मालक माज अजिम पठान, स्टीलिना गणेश गावित वय ८ वर्ष रायगंण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरी वर्गात शिकणारी मुलगी आहे.

तर सोनाली अनिल गावित वय १३ वर्ष राहणार रायगणं सार्वजनिक हायस्कूल येथे ६ वीला शिकत आहे.या मुली अपघातात जखमी झाल्या आहेत. दोघा जखमी मुलींवर उपचार सुरू आहे.एसटी बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा १२:३० ला सुटणार होती. अचानक बस सुरू झाली त्यावेळी खाजगी वाहनाचा चालक रोहिदास खैरणार,बसस्थानक परिसरातील ट्राफिक पोलीस विकी वाघ,जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची परवा न करता बसमध्ये चढुन बसचा ब्रेक दाबून बस थाबवली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनास्थळी लोकांनी एक गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोनवणे,आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली.

बस मध्ये बसलेले विद्यार्थी अंत्यत भयभीत झाले होते.या प्रसंगी रोहीदास खैरणार,पोलिस विकी वाघ,जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढुन ब्रेक दाबून बेकाबु बस थाबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बस मध्ये चालक वाहक नव्हते. फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते. अचानक बस सुरू झाली कशी.? बस अनियंत्रित होऊन मोठा अनर्थ झाला असता. बस अचानक सुरू झाली कशी.. काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.