मिशन लक्ष्यवेध: राज्यातील खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्याची संधी.

मिशन लक्ष्यवेध: राज्यातील खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्याची संधी.

जळगाव महाराष्ट्र शासनाने राज्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या १२ क्रीडा प्रकारांसाठी कार्यरत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवणाऱ्या अकादमींचे सक्षमीकरण करण्यासाठी या योजनेत संस्थांचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.

वर्गीकरण व आर्थिक सहाय्य: अ वर्ग (७६-१०० गुण): वार्षिक रु. ३० लाख ब वर्ग (५१-७५ गुण): वार्षिक रु. २० लाख
क वर्ग (३५-५० गुण): वार्षिक रु. १० लाख हे अनुदान क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी, प्रशिक्षकांच्या मानधनासाठी, तसेच क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.यासाठी अर्ज कुठे करावा?

इच्छुक संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज व आवश्यक माहिती प्राप्त करावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.