केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतरही जळगावमध्ये छेडछाडीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतरही जळगाव जिल्ह्यात मुलींच्या छेडछडीच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.  धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी करत मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे  एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला टवाळखोर शाळेत जाताना, शेतात जाताना पाठलाग करून वारंवार त्रास देत होते. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळ खोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची व बहिणीची छेडखानी करत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या पित्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर केला आहे. छेडछाडीच्या या प्रकरणात पोलिस आता काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करून धीर दिला आहे. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर आपबीती कथन करत टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल केला होता, यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे हे तिघे जण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.