महामार्गावर ट्रक चालकाला लुटले : पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीला वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना २० मार्चच्या रात्री ११.३० वाजता घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील खासगी वाहनचालक राजा गोकुलदास पंजाबी (वय ३६) हा मुक्ताईनगरकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला.

महामार्गावरील पहलवान ढाब्याजवळ जबरदस्तीने वाहन थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १२,५०० रुपये लुटण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित आरोपी हितेश रमेश दामा (डोंबिवली, ता. कल्याण), संदीप रघुनाथ जाधव (उल्हासनगर, जि. ठाणे), किरण नारायण बडगुजर (बहादरपूर, ता. पारोळा) आणि समाधान सदा हटकर (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, समाधान रघुनाथ पवार (पिंपळगाव हरेश्वर) आणि रवी पवार (जळगाव) हे दोघे फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १२,५०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले इनोव्हा वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अजय निकम, गोपीचंद सोनवणे, भूषण माळी, प्रवीण पाटील आणि प्रेमचंद सपकाळे करत आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.