कल्याण येथील विशाल गवळीवरील गुन्हा दाखल प्रकरणी पोलीस विभागाकडून हलगर्जीपणा नाही.

 ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आरोपी विशाल गवळीवर विनयभंगाचे व इतर असे एकूण नऊ गुन्हे कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी विशाल गवळी व अन्य पाच ते सहा गुन्हेगारांनी मानसिक रुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राआधारे विनयभंगछेडछाड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळविल्याचे आढळून आलेले नाही. तसेच या प्रकरणी पोलीस विभागाने हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे त्याबाबतची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य ॲड. अनिल परब यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. गृहराज्यमंत्री कदम म्हणालेविशाल गवळीवर एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्ह्यांमध्ये जामीन प्राप्त झालेला आहे. तरएका गुन्ह्यामध्ये विशाल गवळी सध्या अटकेत आहे. त्यास मानसिक रुग्ण म्हणून जामीन मिळालेला नाही.

विशाल गवळीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्यावर एमपीआयडी सारखा गुन्हा दाखल करता येईल काहे देखील तपासून पाहिले जाईलअसेही कदम यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.