लेकीच्या लग्नात ५०० कोटी उधळणारा अब्जाधीश देशोधडीला; साम्राज्याची धूळधाण, एक चूक भोवली.

 एकेकाळी अब्जाधीश प्रमोद मित्तल आता जीवनावश्यक खर्चासाठीही कुटुंबावर अवलंबून आहेत. प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद मित्तल बँकेच्या कर्जाचा हमीदार व्यवसायात इतका महागडा ठरला की कधीकाळचे धनाढ्य उद्योगपती आता रस्त्यावर आले आहेतदेशात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीने प्रसिद्धी मिळवली आहे आणि काही असे आहेत ज्यांचा आता लोकांनाही विसर पडला आहे. प्रमोद मित्तल यांची कहाणी काहीशी अशी आहे. एकेकाळी जगातील धनाढ्य व्यक्तींपैकी प्रमोद आता प्रत्येक पैशासाठी आपल्या कुटुंबावर अवलंबून आहेत. २०२० मध्ये लंडनच्या न्यायालयाने प्रमोद यांना दिवाळखोर घोषित केले. प्रमोद मित्तल सुप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ आहेत. अखेर असं काय घडलं की प्रमोद मित्तल, माजी स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड (आता JSW इस्पात स्टील) चे अध्यक्ष, आता रस्त्यावर आले.प्रमोद मित्तल यांच्या एकेकाळच्या श्रीमंतीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्यांनी २०१३ मध्ये मुलगी सृष्टीच्या लग्नावर सुमारे ५५० कोटी रुपये खर्च केले होते. पण काळाचे चक्र असे फिरले की २०२० पर्यंत प्रमोद मित्तल यांना लंडनच्या न्यायालयाने दिवाळखोर घोषित केले.

प्रमोद मित्तल यांच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल. एकेकाळी जगातील अब्जाधीशांपैकी प्रमोद मित्तल, गडगंज श्रीमंत लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी कर्जदारांना अडीच अब्ज पौंड (त्यावेळी सुमारे २४००० कोटी रुपये) कर्ज फेडल्यानंतर पूर्णपणे दिवाळखोर झाले आणि आता आपला खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रमोद मित्तल भव्य जीवनशैली आणि उधळपट्टीच्या सवयींसाठी ओळखले जायचे.प्रमोद मित्तल यांच्या दिवाळखोरीची कहाणी बोस्नियन कोक कंपनी GIKIL शी संबंधित आहे. प्रमोद मित्तल यांनी GIKIL च्या कर्जाची हमी दिली होती. जेव्हा GIKIL कर्ज फेडू शकले नाही तेव्हा, त्याचा परिणाम मित्तलांवरही झाला. मित्तल ज्या कंपनीचे हमीदार (गॅरंटर) होते त्या, लंडनस्थित स्टील ट्रेडिंग कंपनीला GIKIL पैशाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि अखेरी श्रीमंत उद्योगपतीला दिवाळखोर घोषित करण्यात आले. २०१९ मध्ये बोस्नियामध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली प्रमोद मित्तल आणि GIKIL च्या इतर दोन अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.दिवाळखोरीच्या वेळी प्रमोद मित्तल ६८ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कर्जदारांना २.५ अब्ज पौंड (त्यावेळी सुमारे २४,००० कोटी रुपये) फेडले. त्यांनी लंडन न्यायालयातील दिवाळखोरीच्या याचिकेत म्हटले की त्यांचे कोणतेही वैयक्तिक उत्पन्न नाही. दिल्लीत त्यांच्या नावावर फक्त ४५ पौंड किमतीची मालमत्ता होती.असे म्हटले जाते की दिवाळखोर झाल्यानंतर प्रमोद मित्तल यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना दैनंदिन खर्चासाठी कुटुंबावर अवलंबून राहावे लागले. दुसरीकडे, प्रमोद यांचे भाऊ, लक्ष्मी मित्तल, अजूनही जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. प्रमोद मित्तल यांचे जीवन एक धडा आहे की व्यवसायाचे निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत आणि चुकीचे निर्णय मोठे संकट निर्माण करू शकतात.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.