भुसावळ संतोषीमाता हॉल परीसर येथे संदिप ढाके , कैलास ढाके बंधु यांनी वडीलांच्या स्मरणार्थ जगवली 13 वृक्ष .

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे
शहरात वाढते तापमान कमी होवुन दिलासा मिळण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे हा विचार मनात ठेवत . वृक्षप्रेमी बंधुंनी वृक्ष लागवड उपक्रम सुरू केला .
नहाटा कॉलेज जवळ नामांकित वेलप्रिंट झेरॉक्स आहे . संचालक संदिप ढाके, कैलास ढाके हे बंधु गेली 4 वर्षापासून वृक्ष लागवड करून देखभाल व उन्हाळ्यात पणी देवून संगोपन करीत आहे . वडिल स्व . देवचंद धना ढाके यांचे स्मरणार्थ संतोषी माता हॉल परिसरात 13 वृक्ष हिरवळीने डुलत आहे . दि . 1 1 ऑगस्ट रोजी या युवकांनी आनंद गॅरेज ते नहाटा चौफुली पर्यंत 10 वृक्ष लागवड केली . पिंपळ, उंबर, कडूनिंब, आकाश मोगरा या प्रकारची 5 फुट उंचीची झाडे स्वखर्चाने ट्रीगार्ड लावले व पाणी घातले . त्यांचे या अभिनव व स्तुत्य उपक्रमाचे ये जा करणारे प्रवासी व कॉलनीतील नागरीक अभिनंदन कौतुक करीत होते . वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे पालकत्व वेलप्रिंट संचालक ढाके बंधु यांनी घेतले आहे . देशी वृक्ष लागडीचे महत्व सांगतांना त्यांनी सांगितले की जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी , पक्षांचा अधिवास वाढवण्यासाठी , धार्मिक महत्व असलेल्या स्थानिक वृक्षांची जोपासना करणे मालिका तयार करणे महत्वाचे आहे या साठी हा छोटासा प्रयत्न आहे . दत्तधाम परीसर राहात्या घराजवळ तीन हजार स्क्वेअर फुट जागेत वडिलांनी लावलेल्या झाडाची साक्ष देतो . असे कैलास व संदिप ढाके बंधुंनी सांगितले .









