15 वाळूतस्करांवर धडक कारवाई.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथाकाने श्रीरामपूर व शेवगाव येथील वाळू तस्करांवर संयुक्तपणे धडक कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी सुमारे 40 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन तर शेवगाव पोेलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश भिंगारदे, रमीजराजा आत्तार, सोमनाथ झांबरे,बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ व बाळासाहेब खेडकर यांचे 02 पथक तयार करून श्रीरामपूर व शेवगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथके रवाना केली होती.

दि. 15 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले परि. पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या इसमांची बातमीदारामार्फत माहिती काढून पंचासमक्ष 4 ठिकाणी छापे टाकले. पथकाने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या 15 आरोपींविरूध्द 4 गुन्हे दाखल करून 40 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएसचे कलम 303 (2) प्रमाणे तेरा आरोपींवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 35 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर शेवगाव पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुध्द बीएनएस 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 5 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.