एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं!

 भंडाऱ्याच्या वाहनी गावातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका भरधाव एसटी बसनं महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.भंडाऱ्याच्या वाहनी गावातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका भरधाव एसटी बसनं महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. यात पतीसह दोन मुलं किरकोळ जखमी झाले असून चिरडल्या गेलेल्या पत्नीचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. ही भीषण घटना  जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी या गावात आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, मीना होमेश्वर कडू ( वय वर्ष 32) असं मृतक महिलेचं नाव आहे. होमेश्वर कडू हे जिल्ह्याच्या तिरोडा इथून दुचाकीनं पत्नी आणि दोन मुलांसह भंडाऱ्याच्या चिखला या त्यांच्या मूळ गावी येत असताना वाहनी या गावात ही घटना घडली. सिहोरा पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून बस ताब्यात घेतली आहे.

सध्या पोलीस या घटनेचा आधिक तपास करत आहेत.भंडाऱ्याच्या साकोली येथील नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकीला गळती लागली आहे. यामुळं टाकीतून पाणी वाहत असल्यानं ती जीर्ण झाल्यानं कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वॉर्डातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. साकोली शहरातील जुनी साकोली इथं ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या या पाण्याच्या टाकीतून जुनी साकोली, सिव्हील वॉर्ड, गणेश वॉर्ड परिसरातील नळ जोडनिधारकांना पाण्याचा पुरवठा केल्या जातोय. या जीर्ण टाकीचे सिमेंट काँक्रीटचे तुकडे पडायला सुरुवात झाली असून टाकीला चारही बाजूंनी छिद्र पडले असून तिथून पाणी गळती होत आहे.

टाकीच्या परिसरात नागरिकांची मोठी वसाहत असल्यानं ती कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ही टाकी तातडीनं पाडवी आणि नागरिकांसाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था नगर परिषदेने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वर्ध्याच्या गोल मार्केटला लागून असणाऱ्या एका पडीक दुमजली इमारतीचा ढाचा अचानक कोसळला. रात्रीची वेळ असल्यानं याठिकाणी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. मात्र दुचाकी व चारचाकी वाहन मलब्याखाली दबल्या गेले. रात्रीला कोसळलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.