मोठी बातमी! युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा, तीन पानी पत्रात काय.

शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कैलास नागरे हे पाण्यासाठी मोठा लढा देत होते. कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसतंय. शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केलीये. अनेक दिवसांपासून ते पाण्यासाठी लढा देत होते. कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. नागरेंच्या आत्महत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर आता सरकारवर जोरदार टीका ही केली जात आहे. ऐन होळीच्या सणाच्याच दिवशी नागरे यांनी हे मोठे चुकीचे पाऊल उचलले आहे.कैलास नागरे यांचा गेल्या काही दिवसांपासून देऊळगाव रागा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा सुरू होता. मात्र, मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. नागरे हे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण देत होते.

शेती क्षेत्रात त्यांचे अत्यंत मोठे योगदान आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने देखील केली होती. ते शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लढा देत.खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे, यासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता. मात्र, अनेक आंदोलनेही करून त्यांची मागणी सरकारकडून पूर्ण केली जात नव्हती. शेवटी मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि सकाळी विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कैलास नागरे यांच्या आत्महत्येची माहिती कळताच, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

कैलास नागरे यांच्या आत्महत्येबद्दल बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे. सरकार प्रयत्नशील राहिल, शेतकऱ्यांच्या अडचणी असल्याने आत्महत्या करत आहे हे दुर्दैवी आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. यावर मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील बोलताना दिसले आहेत. त्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.