कृष्णा आंधळेच्या शोधात रात्रभर सर्च ऑपरेशन, पण.. नाशकात दुचाकीवर दिसल्याचा दावा फसवाच.

संतोष देशमुख हत्येप्रकरणातील व्हायरल फोटोंने खळबळ माजवली. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नाशिकमध्ये आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला. यानंतर पोलिसांनी थेट सर्च ऑपरेशन सुरू केले.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठे खुलासे होताना दिसले. देशमुखांची हत्या किती जास्त क्रूरपणाने केली, हे व्हायरल होणाऱ्या फोटोतून पुढे आले. संतोश देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर कोठडीत आहेत. एसआयटी आणि सीआयडीकडून याप्रकरणातील तपास सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यानचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. शेवटी मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला.

फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या शोधात पोलिस तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आहेत. मात्र, अजूनही कृष्णा आंधळेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. अनेकांनी तर कृष्णा आंधळे जिवंतच नसल्याचा थेट दावाही केला. नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन संपूर्ण शहरात केले. स्थानिकांनी दावा केला की, कृष्णा आंधळे गाडीवरून जात होता.कृष्णा आंधळे ज्या गाडीवरून जात असल्याचा दावा करण्यात आला. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पुढे आले. मात्र. यामध्ये गाडीवरून जाणाऱ्याचा चेहरा आणि गाडीचा नंबर दोन्ही व्यवस्थित दिसत नव्हते.

नाशिक पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू ठेवले. मात्र, अजूनही कृष्णा आंधळेबद्दल काहीच माहिती पुढे आली नाही. आठ दिवसांपूर्वी देखील नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसली.पोलिस अलर्ट मोडवर आहेत आणि त्याचा शोध घेत आहेत. कालपासून सर्च ऑपरेशन करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाहीये. यामुळे कृष्णा आंधळे दिसल्याची फक्त आणि फक्त अफवाच असल्याचे आता सांगितले जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागली आहेत. मात्र, कृष्णा आंधळे हाच एकटा फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कृष्णा आंधळे दिसत होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.